बुधवार, 18 फ़रवरी 2009



आज ब-याच दिवसांनी काही ओळी सुचल्या..


खरंच कविता खरी असते की असतो आभास सारा
दुख-या मनावर शब्दांचा उतारा...

कधी चांदणे ती...कधी रणरणते ऊन
कधी मनात वाजते…होउन आर्त धून...

होई कधी ती...एक पाखरू पाखरू
कधी उदास मनाला कशी सावरू सावरू...

कधी तिच्यासाठी माझ्या..ओल्या मनवाटा
कधी रुसल्या शब्दांचा..उरी सले काटा...

माझा श्वासही अखेर..तुझ्या संगतीने जावा
आज अज्ञात प्रदेशी...तुला धाडते सांगावा...

3 टिप्‍पणियां:

रत्ना हिले ने कहा…

Shripad Sir said...

aabhas vatnaari kavitahi kadhi khup khari aste. mast mast mast...

रत्ना हिले ने कहा…

Mr. Karnik Said..

Mr. Karnik Said..

Ratnaji,

Farach chhan kavita ahe.vichar karayla lavnaari.pratyek oll damdaar.ani shevat jabardast.

kavitela ekhade shirshak dile ahe ka? ki mazya najaretun sutale asave.

Shakil Karnik

रत्ना हिले ने कहा…

Prasad said...


तुम्ही केलेली कविता शब्द बदलून मी माझ्या प्राजक्ताला पाठवून दिली.

मी तीच्यासाठी असं लिहलय...

"तु खरच जवळ असते की असतो आभास सारा,
दु:खी मनाचा हा खेळ तर नसावा,
सुखी तु जीवनात व्हावे,
दु:खाचा तिथे मागमूस नसावा,
आणि माझा अखेरचा श्वास ही... तुझ्या संगतीने जावा."