मनाच्या ओल्या मातीवर
उमटू लागली आहेत
नकळत तुझी पाऊले...
अन् त्या पाऊलखुणा
पुसून टांकण्याचा
माझाही निकराचा प्रयत्न चाललाय
निरर्थकपणे........
प्रत्येकाला मिळावेत
प्रकाशाचे दोन थेंब
आणि प्रत्येकाच्या जीवनाचा
एखादा तरी कोपरा
उजळत जावा....
प्रत्येकाला मिळावी कधी
रंगांची सोबत....
आणि प्रत्येकाच्या जीवनाचा
एखादा तरी धागा सप्तरंगी व्हावा.......
सप्तरंगी व्हावा....
रविवार, 20 अप्रैल 2008
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें